अफगाण मुलींना शिकवण्याचं आव्हान
1,278,883 plays|
शबाना बसीज-रसिख |
TEDxWomen 2012
• December 2012
कल्पना करा अशा एका देशाची, जिथे मुलींना लपून छपून शाळेत जावं लागतं. आणि शिकताना पकडलं गेलं तर प्राणघातक परिणाम भोगावे लागतात. असा होता तालिबानच्या अंमलाखालचा अफगाणिस्तान. या भयाचा अंश आजही शिल्लक आहे. बावीस वर्षांची शबाना बसीज-रसिख अफगाणिस्तानात मुलींसाठी शाळा चालवते. ती एका कुटुंबाच्या, मुलींवर विश्वास टाकण्याच्या निर्णयाचं कौतुक करते. आणि धमक्यांना तोंड देणाऱ्या तिथल्या एका शूर पित्याची कहाणी सांगते.